अर्थ : एखादी गोष्ट इतरांच्या सन्मुख ठेवणे.
उदाहरणे :
तो चित्राद्वारे आपले विचार अभिव्यक्त करतो
समानार्थी : अभिव्यक्त करणे, प्रकट करणे, मांडणे, व्यक्त करणे
अर्थ : चिह्न, सूत्र इत्यादी माध्यमांच्या आधारे सांगणे किंवा माहिती देणे.
उदाहरणे :
तुम्ही ह्या दोन शहरांमधील अंतर किलोमीटरमध्ये सांगाल.
अर्थ : एखाद्याच्या समोर एखादी घटना वा प्रसंग इत्यादींशी संबंधित लोकांचे नाव सांगणे.
उदाहरणे :
त्याने पोलीसांसमोर चौघांची नावे घेतली.
समानार्थी : घेणे
अर्थ : एखाद्याविषयी ठामपणे अथवा आत्मविश्वासाने एखादी माहिती देणे.
उदाहरणे :
मी तुम्हाला सांगितले होते की तो चांगला माणूस नाही आहे.
अर्थ : मौखिक वर्णन करणे.
उदाहरणे :
त्याने आपली कहानी लोकांना सांगितली.
अर्थ : एखाद्या गोष्टीची माहिती करून देणे.
उदाहरणे :
त्याने मला सांगितले की तो काम सोडून चालला आहे.
अर्थ : एखादी वस्तू, काम इत्यादीविषयी माहिती कळेल असे करणे.
उदाहरणे :
त्याने सांगितले की रहीम आज येणार नाही.
समानार्थी : कळवणे, कळविणे, बोलणे, सूचना देणे
अर्थ : सांगण्याचे काम दुसर्याकडून करविणे.
उदाहरणे :
दुधासाठी मी गवळ्याला सांगितले.
सांगणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saangne samanarthi shabd in Marathi.